देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. आजपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरून पुण्यासाठी पहिल्या विमानाचं उड्डाण, मुंबईतून 50 विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिगला परवानगी

2. श्रमिक मजुरांच्या ट्रेन्सवरुन रेल्वे मंत्री पियुष गोयल आक्रमक; रेल्वेकडे मजुरांची यादी न पाठवल्याची महाराष्ट्र सरकारला रेल्वे मंत्र्यांकडून पुन्हा एकदा ट्विटरवरुन

3. राज्यात काल दिवसभरात 3 हजार 41 नवे कोरोनाग्रस्त, राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 50 हजार पार, एकट्या मुंबईत 30 हजारांहून अधिक रुग्ण

4. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता, पण येणाऱ्या परिस्थितीसाठी सरकार सज्ज, मुख्यमंत्र्यांची माहिती, नागरिकांना रक्तदान करण्याचंही आवाहन

5. मुंबईतील महत्वाच्या हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर मंदावला, वरळीचा अंतर्भाव असलेल्या जी दक्षिण विभागाचा दर 3.4 टक्क्यांवर, तर डबलिंग रेटही 21 दिवसांवर

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 25 मे 2020 | सोमवार | ABP Majha



6. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात कोरोना बाधिताच्या मृतदेहाशेजारीच रुग्णावर उपचार, दुसऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा आरोप, नितेश राणे यांच्याकडून व्हिडीओ ट्वीट

7. केरळ सरकारला तज्ञ डॉक्टर अन् नर्सेस पाठवण्याची महाराष्ट्राची विनंती; केरळच्या आरोग्य मंत्र्यांना महाराष्ट्राच्या आरोग्य शिक्षण विभागाचे संचालक तात्याराव लहाने यांचं पत्र

8. जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 लाखांवर, तर 3 लाख 50 हजार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; आतापर्यंत 22 लाख 99 हजार 345 रुग्ण कोरोनामुक्त

9. देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 31 हजारांवर, 54 हजारांहून अधिक कोरोनामुक्त, तर 3 हजार 867 रुग्णांचा मृत्यू

10. देशभरात 4 कोटीपेक्षा अधिक प्रवासी मजूर, तर आतापर्यंत 75 लाखाहून अधिक मजूर आपल्या घरी पोहचले; केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती