मुंबई : मुंबईतील तुलनेनं कमी रुग्ण असलेल्या अनेक विभागांमध्ये रुग्णसंख्या वेगानं वाढत आहे. तर मुंबईतील महत्वाच्या हॉटस्पॉटमध्ये मात्र रुग्णसंख्या वाढीचा दर मंदावला आहे. घाटकोपरचा परिसर अंतर्गत असणाऱ्या एन वॉर्ड मध्ये सर्वाधिक 13.7 टक्के रुग्णवाढीचा दर आहे.


विशेष म्हणजे मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या वरळीचा अंतर्भाव असलेल्या जी दक्षिण विभागाचा रुग्णसंख्या वाढीचा दर सर्वात कमी आहे. येथील रुग्णवाढीचा दर 3.4 टक्के असून इथला डबलिंग रेटही 21 दिवसांवर गेला आहे. मुंबईतील 8 वॉर्डमध्ये रुग्णवाढीचा दर 8 टक्केपेक्षा जास्त आहे.


मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा दर 16 ते 22 मे दरम्यान 6.61 टक्के इतका आहे. प्रत्येक विभागात 7 दिवसांत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या एकत्र त्या विभागाची सरासरी दैनंदिन रुग्णवाढ संख्या निश्चित केली जाते. प्रतिदिन रुग्णवाढीचा दर म्हणजे मागील दिवसाच्या तुलनेत त्या विभाहात झालेल्या एकूण रुग्णवाढीची टक्केवारी.


मुंबईतल्या रुग्णसंख्या वाढीचा दर कोणत्या विभागात किती?




  • एन वॉर्ड - घाटकोपरचा भाग - 13.7 टक्के

  • पी नॉर्थ - मालाड, मालवणी, दिंडोशीचा भाग - 11.9 टक्के

  • टी वॉर्ड - मुलुंडचा भाग- 11.9 टक्के

  • पी साऊथ - गोरेगांवचा भाग 10.9 टक्के

  • एस वॉर्ड - भांडुप, विक्रोळीतील भागाचा समावेश 10 टक्के

  • आर साऊथ - कांदिवलीचा भाग 9.4 टक्के

  • आर मध्य - बोरिवलीचा भाग 8.9 टक्के

  • एफ साऊथ - परळ, शिवडीचा समावेश - 8.2 टक्के


तुलनेनं रुग्णसंख्या वाढ कमी होत असणारे वॉर्ड




  • जी साऊथ - वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर - 3.4 टक्के

  • ई वॉर्ड - भायखळा, भायखळा फायर ब्रिगेडच्या आसपासचा भाग - 4.2 टक्के

  • डी वॉर्ड - नाना चौक ते मलबार हिल परिसर - 4.6 टक्के

  • एम ईस्ट - गोवंडी, मानखुर्दचा समावेश - 6.1 टक्के

  • एच ईस्ट - वांद्रे पूर्वचा भाग, वाकोला परिसर, कलानगर ते सांताक्रुझ (मातोश्री) - 7.4 टक्के

  • के वेस्ट - अंधेरी पश्चिमचा भाग - 5.5 टक्के

  • एल वॉर्ड - कुर्ला परिसराचा समावेश- 7.4 टक्के

  • जी नॉर्थ - दादर, माहिम, धारावी - 5.1 टक्के

  • के ईस्ट - अंधेरी पूर्वचा समावेश, जोगेश्वरी - 7.8 टक्के

  • एम वेस्ट - चेंबुरचा समावेश - 6.3 टक्के

  • एफ नॉर्थ - सायन, माटुंगा, वडाळा समावेश - 4.6 टक्के

  • एच वेस्ट - वांद्रे, सांताक्रुझ पश्चिमचा भाग - 7.5 टक्के

  • बी वॉर्ड - मशिदबंदर भाग 6.3 टक्के

  • आर नॉर्थ - दहिसरचा भाग 6.5 टक्के

  • ए वॉर्ड - कुलाबा, कफपरेड, फोर्टचा परिसर 5 टक्के

  • सी वॉर्ड - पायधुणी, भुलेश्वर 7.4 टक्के


Bhendi Bazaar | मुंबईच्या भेंडी बाजारात जीवघेणी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा