देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. ईडब्लूएसचा लाभ घेता यावा म्हणून अकरावी प्रवेशाची विशेष फेरी लांबणीवर, प्रमुख व्यायवसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचीही मुदत वाढवली


2. पुण्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग चार जानेवारीपासून सुरु होणार, महापालिका प्रशासनाची परवानगी, नियमांचं पालन करणं बंधनकारक


3. 25 नोव्हेंबरपासून ब्रिटनमधून परतलेल्यांची शोधाशोध सुरु, मुंबईत जवळपास दीड हजार तर ठाण्यात 350 प्रवासी ब्रिटनहून परतल्याची माहिती


4. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स, RTPCR टेस्ट न केलेल्यांना 7 दिवसांसाठी सशुल्क संस्थात्मक क्वॉरंटाईन


5. आज एकाच वेळी नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार, मोदींच्या हस्ते किसान सन्मान निधीचं वाटप


6. बार्कचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांना अटक, टीआरपी घोटाळ्याप्रकरणी सर्वात मोठी कारवाई, आतापर्यंत 15 जण गजाआड


7. देशभरात 1 जानेवारीपासून वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती, फास्टॅग फायदेशीर ठरण्याचा विश्वास


8. मुंबई आणि ठाण्यात सर्वात जास्त लठ्ठ मुलं, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल, इतर जिल्ह्यातील स्थूल बालकांचंही प्रमाण वाढलं


9. जगभरात नाताळच्या सेलिब्रेशनवर कोरोनाचं सावट, मोजक्या जणांच्या उपस्थितीत चर्चमध्ये कार्यक्रमांचं आयोजन


10. माजी कसोटीवीर चेतन शर्मा बीसीसीआय निवड समितीचे नवे अध्यक्ष, ॲबी कुरुविला आणि देबाशीष मोहंती यांचाही निवड समितीत समावेश