1. मॉल्स वगळता इतर दुकानं सुरु राहणार, केंद्र सरकारकडून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता, मास्क बंधनकारक, 50 टक्के कर्मचारी, सोशल डिस्टन्सिंगच्या अटींसह दुकानं उघडण्यास परवानगी


2. राज्यात काल दिवसभरात 394 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 6817, मुंबईत जवळपास साडे चार हजार कोरोनाबाधित तर पुण्यातील आकडा एक हजाराच्या पार


3. जगभरात कोरोनाचे सुमारे दोन लाख बळी, 24 तासात एक लाख नवे रुग्ण, 210 देशांमध्ये आतापर्यंत 28 लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण


4. कोरोनाशी संबंधित सर्व सरकारी रुग्णालयातील सर्व उपचार आणि चाचण्या निशुल्क; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती


5. राज्यात कोरोना व्हायरसच्या पूल टेस्टिंग आणि प्लाज्मा थेरपीला केंद्र सरकारची मान्यता; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती


6. कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा; सत्यजीत तांबे यांच्या पत्राला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा सकारात्मक प्रतिसाद


7. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांना दोन पत्र, राज्यातील वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ आणि उद्योगांना चालना देण्यासाठी प्रकिया सुलभ करण्याची मागणी


8. लॉकडाऊन हटला नाही तर मे अखेरपर्यंत देशात 4 कोटी मोबाईल निकामी, आयसीईएचा दावा, मोबाईल विक्री आणि दुरुस्तीच्या दुकानांवरील निर्बंधांमुळे परिस्थिती ओढवण्याचं मत


9. परभणीत नगरसेवकाच्या मुलाने तहसीलमध्ये बसून एका दिवसात बोगस 700 शिधापत्रिका करुन घेतल्याचा आरोप, खासदार संजय जाधव यांच्याकडून तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी


10. पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घरातच नमाज पठण करण्याचं मुख्यमंत्र्यांसह अनेकांचं आवाहन