देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. 63 दिवसांनंतर सुरु होणाऱ्या देशांतर्गत विमानसेवेला गहमंत्री अनिल देशमुखांचा विरोध, रेड झोनमध्ये हवाई वाहतूक सुरु करणं म्हणजे कोरोनाचा धोका वाढवणं, अनिल देशमुखांची माहिती

2. दिवसभरात राज्यात कोरोनाच्या 2 हजार 608 नव्या रुग्णांची भर, महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 47 हजार 190, एकट्या मुंबईत 1 हजार 566 रुग्ण वाढले

3. जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच, जगात कोरोनाबाधितांचा आकडा 54 लाखांवर तर 22 लाखांहून अधिक कोरोनामुक्त

4. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन कोरोनावर प्रभावी औषध नाही, प्रसिद्ध मेडिकल जर्नल लॅन्सेटचा दावा, औषधांमुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचंही मत

5. हिंगोलीत रात्रीतून 44 नव्या रुग्णांची भर, मुंबईहून आलेल्या 10 तर दिल्लीहून आलेल्या तिघांना कोरोनाची लागण, रत्नागिरी जिल्ह्याचा आकडाही दीडशेच्या जवळ

6. औरंगाबादेत भाजप खासदार भागवत कराड यांच्या मुलाची भाजप कार्यकर्त्यालाच मारहाण, वॉर्डात येऊन काम केल्याच्या रागातून मारहाण, खासदारमुलासह दोघांविरोधात गुन्हा

7. रुग्णवाहिकेत स्ट्रेचर नसल्यानं वृद्धाचे हाल, मुलांना कोरोनाची लागण झाल्यानं संशयित आईवडिलांना घ्यायला आले असतानाची कल्याणमधील घटना, केडीएमसीच्या कारभारावर संताप

8. एमबीए/एमएमएस सीईटीचा निकाल जाहीर; 10 वर्षांपासून सीईटी देणारे डोंबिवलीचे शशांक प्रभू राज्यात पहिले

9. बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या रेड चिलीज निर्मित 'बेताल' या आगामी वेब सीरिजचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, स्थगिती देण्यास  मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

10. महिला सुरक्षेसाठी फेसबुकचं प्रोफाईल लॉक करणारं नवं फीचर, अनोळखी व्यक्तींचा हस्तक्षेप रोखण्यासाठी महत्वाचं पाऊल