देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. पूर्व लडाखमधून सैन्य हटवण्यास चीनची सहमती, कमांडर स्तरावरील बैठकीत महत्त्वाचा निर्णय, लष्करप्रमुख मनोज नरवणे लडाखमध्ये


2. भारत-चीन सीमावादानंतर केंद्र सरकारवरील लोकांचा विश्वास कायम, एबीपी न्यूज-सी वोटरचा सर्व्हे, चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठीही लोकांचा आग्रह


3. पाकिस्तानच्या हेरगिरीला भारताचं चोख उत्तर, दिल्लीमधील पाकिस्तान दूतावासामधील कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्के करण्याच्या सूचना, तर पाकिस्तानमधील भारतीय दूतावासातील कर्मचारी संख्या कमी करणार


4. महाराष्ट्रात काल दिवसभरात 3 हजार 214 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 248 जणांना कोरोनामुळे मृत्यू, 1925 रुग्ण कोरोनामुक्त


5. ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर आणि उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांची बदली, वाढत्या कोरोना रुग्णांमुळे तडकाफडकी बदली झाल्याची चर्चा


6. पुलवामात दहशतवाद्यांशी लढताना सोलापूरच्या सुनील काळे यांना वीरमरण, पार्थिव मूळगावी दाखल, आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार


7. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा


8. चाचपणी होईपर्यंत पतंजलीच्या कोरोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आयुष मंत्रालयाचे आदेश, स्पष्टीकरण देण्याची पतंजलीला सूचना


9. खेळाडूही कोरोनाच्या विळख्यात, प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण, पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह


10. ज्येष्ठ कलावंतांना सेटवर परवानगी नाहीच, नियम-अटीत बदल करुन नवा अध्यादेश जारी, सेटवर डॉक्टर-नर्सऐवजी रुग्णालयात घेऊन जाणारी गाडी असणं बंधनकारक