1. मतमोजणीसाठी उरले काही तास, प्रशासकीय यंत्रणा सज्ज, एबीपी माझावर सर्वात वेगवान निकाल

    2. यंदा दिवाळीवर पावसाचं सावट, 28 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता

    3. फटाक्यांची विक्री करण्याची परवानगी तडकाफडकी देता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण

    4. जेव्हीएलआर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, टँकरचा अपघात झाल्यानं मनस्ताप

    5. कुर्ल्यात पूर्व द्रुतगती मार्गावर संतप्त नागरिकांची पोलिसांवर दगडफेक, बेपत्ता मुलीचा शोध न लागल्यानं वडिलांची आत्महत्या, लोकांचा संताप अनावर






  1. पीएमसीप्रकरणी 30 ऑक्टोबरला निर्णय घेणार, खातेदारांचा पैसा सुरक्षित असल्याचा निर्वाळा देताना आरबीआयची माहिती, आझाद मैदानातलं आंदोलन मागे

  2. सोशल मीडियाचा दुरुपयोग टाळण्यासाठी धोरण आखा, सुप्रीम कोर्टाकडून केंद्र सरकारला तीन महिन्यांची मुदत, यूजर्सच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ न करण्याच्याही सूचना

  3. स्वंयघोषित कल्की भगवानच्या आश्रमावर आयकर विभागाची छापेमारी, 600 कोटींची संपत्ती सापडली

  4. अक्षय कुमार आणि रितेशच्या हाऊसफुल चित्रपटामुळे ‘हिरकणी’ला थिएटर मिळेनात, मनसे कार्यकर्ते आक्रमक, थिएटर न मिळल्यास खळ्ळखट्याकचा इशारा

  5. टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी धुव्वा, रोहित शर्माला मालिकावीर आणि सामनावीराचा बहुमान