देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...




  1. राज्यात कालपासून नाईट कर्फ्यूला सुरुवात; मुख्य शहरांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त, विनाकरण फिरणाऱ्यांवर कारवाई



  1. राज्यात थंडीचा कडाका वाढला, महाबळेश्वरमध्ये तापमान 9 अंश सेल्शिअसवर, मुंबईच्या तापमानातही लक्षणीय घट



  1. आजपासून 14 हजार 234 ग्रामपंचायती निवडणुकांची अर्जप्रक्रिया सुरु, सलगच्या सुट्ट्यांमुळे अर्जासाठी फक्त पाच दिवस



  1. चेन्नईत नॉन पिक अवरमध्ये सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु, सर्वसामान्य मुंबईकरांच्या वाटेला अद्याप प्रतिक्षाच



  1. सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा फेब्रुवारीपर्यंत होणार नाही, शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांची माहिती



  1. इलेक्टोरल बॉन्डशी संबंधित माहिती गोपनीय, ती सार्वजनिक करता येणार नाही; केंद्रीय माहिती आयोगाकडून स्पष्ट



  1. ठाणे महापालिकेने पाणी पुरवठा कर न भरलेल्या 1 हजार 313 नळ जोडण्या तोडल्या ; कारवाई टाळण्यासाठी बिलांची देयके तातडीने भरण्याच्या सूचना



  1. महापालिकेत नोकरीला लावण्याचं आमिष, मुंबईतील जॉब रॅकेटचा पर्दाफाश, 500 जणांची लाखो रुपयांची फसवणूक



  1. कोरोनाची लस नवीन विषाणूवर किती प्रभावी असेल हे सांगण कठीण, कोविड टास्क फोर्सचे प्रमुख संजय ओक यांची माझाला मुलाखत



  1. नव्या कोरोनाचा मृत्यूदरावर फारसा परिणाम नाही, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांची माहिती