1. लासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाला, मुंबईतल्या मसीना बर्न रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

    2. राधाकृष्ण विखे पाटीलही काँग्रेसमध्ये परततील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे संकेत, नाईलाजास्तव भाजपात गेल्याचं वक्तव्य

    3. अकोला प्रहारचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांची हत्या, अकोटच्या कबुतरी मैदानावर अज्ञातांकडून रात्री दोघांकडून पुंडकरांवर गोळीबार

    4. वारिस पठाणांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास बंदी, मुस्लिमांना चिथावणाऱ्या वक्तव्यानंतर ओवेसींची कारवाई, औरंगाबाद, बीड आणि पुण्यात पठाणांविरोधात आंदोलन

    5. सीएएला घाबरण्याची गरज नाही, नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

    6. उदयनराजेंचं पक्षातलं योगदान काय? राज्यसभेसाठी भाजपची अधिकृत उमेदवारी मागताना संजय काकडेंचा सवाल, प्रदेशाध्यक्षांचं सूचक मौन






  1. आज संघाच्या अंगणात भीम आर्मीचा मेळावा, अटी-शर्थींसह चंद्रशेखर आझाद उर्फ रावणाच्या सभेला न्यायालयाची परवानगी

  2. जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये पोलिस आणि अतिरेक्यांमध्ये चकमक, दोन आतंकवाद्याना कंठस्नान, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त

  3. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय महिलांची विजयी सलामी, फिरकीपटू पूनम यादवच्या चार बळींच्या जोरावर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी उडवला धुव्वा

  4. महाराष्ट्राच्या विकासाप्रती नव्या सरकारचं धोरण, तर विरोधकांची भूमिका काय?  'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' सकाळी 10 वाजल्यापासून