देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. सीबीआयची पाच पथकं सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करणार, प्रत्येक पथकावर विशेष जबाबदारी, तर काल रात्री मुंबई पोलीस आयुक्तांची गृहमंत्र्यांशी खलबतं


2. रिया चक्रवर्तीकडून महेश भट्ट यांना चक्क देवाची उपमा, सुशांतच्या मृत्यूच्या आठवडाभरापूर्वीचं रिया आणि भट्ट यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट उजेडात


3. आज राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई, पश्चिम उपनगर आणि ठाण्यात जोरदार पावसाला सुरुवात; विदर्भालाही अलर्ट


4. राज्यातील बाजार समित्यांचा आज बंद, केंद्र सरकारच्या शेतमाल नियमन मुक्तीच्या आदेशाच्या विरोधात बंद पुकारला


5. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणे आणि नाशिकमधील बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी, मुंबईच्या दादरमध्येही नागरिकांची झुंबड, अनेक नागरिक विनामास्क रस्त्यावर


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 ऑगस्ट 2020 | शुक्रवार | ABP Majha



6. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण, ट्वीटद्वारे माहिती; संपर्कात आलेल्यांना योग्य ती काळजी घेण्याचंही आवाहन


7. गडचिरोली प्रशासनाची एसटी प्रवाशांसाठी नवी नियमावली, एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस विलगिकरणात राहण्याचं हमीपत्र देणं बंधनकारक


8. मुंबईच्या महापौरांकडून कोविड सेंटरच्या कामात घोटाळा, मनसे आणि भाजपचा गंभीर आरोप, मुलाला कंत्राट दिल्याप्रकरणी राजीनाम्याची मागणी, महापौरांनी आरोप फेटाळले


9. कोल्हापूरच्या महापुरात सरकारी मदत देताना घोटाळा झाल्याचा सामाजिक संघटनांचा आरोप, 43 गावं तहसिलदारांना निवेदन देणार


10. पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांची भारताला पुन्हा एकदा धमकी, युद्ध झाल्यास भारताविरोधात अणुबॉम्ब वापरू, शेख रशिद अहमद पुन्हा एकदा बरळले