देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद दौऱ्यावर; दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद, मोठी घोषणा करण्याची शक्यता


 

  1. कामावर जाण्यासाठी सकाळी सातपासूनच लोकल प्रवासाची महिलांची मागणी; तर सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार, आज राज्य आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये बैठक


 

  1. राज्यात मास्क दरावर अखेर नियंत्रण, मास्कचे नवे दर 3 रुपये ते 127 रुपये; किंमती नियंत्रणात आणण्याचा अहवाल देणारे अधिकारी सुधाकर शिंदेंची बदली


 

  1. मुंबई वीज पुरवठा ठप्प होण्यावरून राज्य सरकारने नेमली चौकशी समिती, दोषींवर कठोर कारवाईचे ऊर्जामंत्र्याचे संकेत


 

  1. कोकणातली रिफायनरी प्रकल्प बारगळला, रायगडमध्ये पाच हजार एकरवर रिफायनरी ऐवजी ओषध निर्मिती प्रकल्प उभारणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय


 

  1. पुण्यात दुसऱ्या दिवशीही ऑनलाईन परीक्षेत तांत्रिक बिघाड; तर घोळामुळे अमरावती विद्यापीठाची आजची परीक्षा रद्द, उद्यापासून मात्र नियमीत परीक्षा


 

  1. नंदुरबारमध्ये धुळे-सूरत महामार्गावर भीषण अपघात, कोडांईबारी घाटातल्या दरीत बस कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू, तर 35 जण गंभीर जखमी


 

  1. बीएमसी नगरसेवकांची कामगिरी 2019-20 मध्ये 55.7 टक्क्यांपर्यंत घसरली, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल


 

  1. देशात लॉकडाऊन संपलं आहे, मात्र सर्वांनी काळजी घेणे आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदीचं देशवासियांना आवाहन


 

  1. धवनच्या शतकानंतरही दिल्लीच्या पदरी पराभव; किंग्स इलेव्हन पंजाब 5 विकेट्सनी विजयी