देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- कार्तिकी यात्रेदरम्यान पंढरपुरात संचारबंदी, 22 ते 26 नोव्हेंबरपर्यंत पंढरपुरात एसटी बंद राहणार; कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निर्णय
- उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक कार्तिकी एकादशीची महापूजा करणार, निवडणूक आयोगाकडून नियम, अटींसह शासकीय महापूजा करण्यास मान्यता
- मुंबई, ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार, मात्र नाशिकमधील शाळा सोमवारपासून सुरु करणार; गोंधळलेलं सरकार म्हणत प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
- राज्यात आदिवासी विकास विभागातील माध्यमिक वर्ग 1 डिसेंबरपासून सुरू होणार, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांची माहिती
- कोरोनाची लस अंतिम टप्प्यात, काल पंतप्रधान मोदींनी देशातील स्थितीचा आढावा; तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्ली, अहमदाबाद, मध्य प्रदेशात लॉकडाऊनची तयारी
- महाविकास आघाडी सरकार पलटूराम सरकार, वीज बिलांवरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका
- सरकारमधील एका मंत्र्याने वीजबिल माफीची फाईल दाबली, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
- राज्यातील प्रमुख नद्यांवर वाळूमाफियांचा कब्जा, कारवाईसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ल्याचं सत्र सुरु; अवैध वाळू उपसा माझाच्या कॅमेऱ्यात कैद
- पुढच्या वर्षी सिडकोची 60 हजार घरांची लॉटरी, CIDCO चे एमडी संजय मुखर्जी यांची माहिती
- सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांच्या विरोधातलं ट्वीट महागात, अॅटर्नी जनरल यांची कुणाल कामराविरोधात न्यायालयीन कारवाई करण्यास संमती