मुंबई : देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. महाशिवरात्रीचा आज देशभरात उत्साह, राज्यातील भगवान शंकराच्या मंदिरांना फुलांची सजावट, दर्शनासाठी भक्तांची पहाटेपासून गर्दी

2. उद्धव ठाकरे आज पंतप्रधान मोदी आणि सोनिया गांधींना भेटणार, मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलीच मोठी भेट, दोन्ही भेटींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष

3. सरकारी नोकरभरतीसाठी महापोर्टलद्वारे परीक्षा न घेण्याचा निर्णय, ठाकरे सरकारचा फडणवीसांना आणखी एक धक्का, नव्या पोर्टलसाठी निविदा मागवल्या

4 .15 कोटी 100 कोटींवर भारी , मुस्लिमांना चिथावणाऱ्या वारिस पठाणांच्या वक्तव्यावर चौफेर टीका, तर ओवेसींच्या व्यासपीठावर घोषणाबाजी करणाऱ्या तरुणीविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा

5. ठाकरे सरकार आणि राज्यपालांमध्ये ठिणगी, ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडीचा अध्यादेश राज्यपालांनी फेटाळला

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 फेब्रुवारी |शुक्रवार | ABP Majha



6. सरकारी तिजोरी रिकामी असताना मंत्र्यांसाठी 18 मजली इमारत उभारणार, आराखडा माझाच्या हाती, जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरु असल्याचा भाजपचा आरोप

7. टोलनाक्यांवरील वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी लेनची संख्या वाढवा, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

8. विद्यार्थ्यांना खूशखबर, बारावीतील नापास शेरा गायब होणार गुणपत्रिकेवर येणार एलिजिबल फॉर ओन्ली स्कील डेव्हलपमेंट प्रोग्रामचा शेरा

9. सोन्याच्या दरात ऐतिहासिक उसळी, प्रतितोळा दर तब्बल 43 हजारांवर...ऐन लग्नसराईच्या तोंडावर दरवाढ झाल्यानं ग्राहकांमध्ये नाराजी

10. महिला ट्वेन्टी 20 क्रिकेट विश्वचषकाला आजपासून सिडनीमध्ये सुरुवात, सलामीच्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने