देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...



    1. महाराष्ट्रात काल दिवसभरात कोरोनाचे 2 हजार 127 नवे रुग्ण, 24 तासात राज्यात सर्वाधिक 76 मृत्यूची नोंद, एकट्या मुंबईत 43 जण दगावले

    2. चौथ्या लॉकडाऊनच्या नियमावलीनुसार राज्यात मॉल्स, चित्रपटगृहं, शैक्षणिक संस्था बंदच राहणार, समारंभांवरही निर्बंध; मेट्रो, रेल्वे आणि विमानसेवाही बंदच

    3. देशात येत्या  1 जूनपासून 200 नॉन एसी ट्रेन सुरु होणार, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची घोषणा; लवकरच ऑनलाईन बुकिंगही सुरू होणार

    4. मंत्रालयातील दीड हजार कर्मचारी मुंबई पोलिसांच्या मदतीला, पोलिस स्टेशनमध्ये थांबून कामगारांना गावी पाठवण्यासाठी काम करणार

    5. विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेऊ शकत नाही, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचं यूजीसीला पत्र, सीईटी परीक्षा तालुका स्तरावर घेण्याचा विचार

    6. एपीएमसी मार्केट बंद न केल्यास मोर्चा, भाजप आमदार गणेश नाईकांचा इशारा, एपीएमसीमुळं कोरोना पसरत असल्याचा दावा

    7. ठाण्यात परवानगी नसतानाही खुलेआम दारुविक्री, उथळसरमधील प्रकार 'माझा'च्या कॅमेऱ्यात, पोलिसांची फक्त बघ्याची भूमिका

    8. अम्फानमुळे ओडिशात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस, आज दुपारपर्यंत चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनाऱ्याला धडकणार

    9. अमेरिकेत दिवसभरात दीड हजारांहून अधिक रुग्णांचा बळी, तर ब्राझीलमध्ये पहिल्यांदाच 24 तासात मृतांचा आक़डा एक हजार पेक्षा जास्त

    10. कोरोनाचं 'मूळ' शोधण्यासाठी अखेर चौकशी होणार, जागतिक आरोग्य सभेत ठराव पास, जागतिक दबावापुढे अखेर चीन झुकला