- लोकसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत, एबीपी नेल्सनसह इतर वाहिन्यांच्या एक्झिट पोल्सचा अंदाज, काँग्रेसला दीडशे जागांचा पल्ला गाठणंही कठीण
- महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 17 जागा मिळण्याचा अंदाज, भाजपला 6 जागांवर फटका बसण्याची शक्यता, राष्ट्रवादीच्या जागा वाढण्याचंही भाकित
- उत्तर प्रदेशात भाजपला 50 जागांवर फटका बसण्याची शक्यता, मायावती 30 जागांवर मुसंडी मारण्याचा अंदाज, तर बंगालमध्ये ममतांच्या जागा घटण्याचीही शक्यता
- स्वबळावर तीनशेचा आकडा पार करु, भाजप नेत्यांना विश्वास तर एक्झिट पोल शंकास्पद असल्याचा काँग्रेस नेत्यांचा दावा
- महाराष्ट्रात युतीला 42 च्या वरच जागा मिळतील, काँग्रेस-राष्ट्रवादीला पाच जागाही मिळणार नाहीत, एक्झिट पोलच्या अंदाजानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा विश्वास
- मोदींच्या देवदर्शनाच्या प्रक्षेपणामुळे आचारसंहितेचा भंग, ममता बॅनर्जींची निवडणूक आयोगाकडे तक्रार, तर केदारनाथानंतर मोदी बद्रीनाथा चरणी लीन
- भाजपमधून आलेल्या नवज्योत सिंह सिद्धूंना मुख्यमंत्री बनायचंय, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विधानानं पंजाब काँग्रेसमधली धुसफूस चव्हाट्यावर
- मुंबईतील टिळक नगर स्थानकात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला रेल्वे कर्मचाऱ्याची बेदम मारहाण, नो पार्किंगमध्ये गाडी उभी करण्यास मनाई केल्याने संताप, घटना सीसीटीव्हीत कैद, आरोपीला बेड्या
- रविवार ठरला अपघातवार, वणीच्या सप्तश्रुंगी गडावरुन परतताना भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू, सहा जखमी, तर धुळ्यात आमदाराच्या गाडीच्या धडकेत दोन भावंडांचा मृत्यू
- मध्य रेल्वेचं ऑपरेशन पादचारी पूल यशस्वी, शहाड आणि आसनगाव रेल्वे स्थानकातले जीर्ण पूल हटवले, तर टिटवाळ्यात नवीन पुलासाठी गर्डर टाकला