1. शिवसेनेची तलवार‘म्यानबंद’ नाही, आम्ही आमचा बाणा जपला, जपत राहू, 'सामना'त युतीबाबत स्पष्टीकरण 
 
  1. युतीच्या घोषणेनंतर नारायण राणे वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्र्यांशी चाळीस मिनिटं चर्चा, स्वार्थासाठी युती केल्याचा शिवसेनेवर आरोप
 
  1. तिसरी पिढी लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार नाही, पार्थ आणि रोहितबद्दल शरद पवारांचं स्पष्टीकरण
 
  1. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरवर बंदी घाला,  फ्रान्सचा संयुक्त राष्ट्र संघात प्रस्ताव, भारताच्या कूटनितीला मोठं यश 
 
  1. पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यातील सर्व पेट्रोल पंप आज सायंकाळी20 मिनिटांसाठी बंद, सर्व व्यवहार बंद राहणार 
 
  1. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात3 टक्क्यांची वाढ, महागाई भत्ता 9 टक्क्यावरुन 12 टक्के
 
  1. मुंबई शहरासह देशातील16 राज्ये, केंद्रशासित प्रदेशात महिला सुरक्षेसाठी आपत्कालीन प्रतिसाद सहाय्य यंत्रणा सुरु, आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी 112 टोल फ्री क्रमांक
 
  1. भिवंडीत लघुशंकेच्या वादातून दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न, दोन गंभीर, मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
 
  1. मुंबई महापालिकेच्या डम्पिंगसाठी आदिवासींची घरं तोडली, अंबरनाथच्या करवले गावात भूसंपादनाला सुरुवात
 
  1. विदर्भ, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता,  शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठेवावा, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन