देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता जनतेशी संवाद साधणार, कोणत्या घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष


2. सोनियांच्या लेटर बॉम्बमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली, काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस, नवाब मलिकांचं वक्तव्य, तर बाळासाहेब थोरातांचा पलटवार


3. 2005 पूर्वीच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार, 10 जुलैचा निर्णय राज्य सरकारकडून मागे


4. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन, वायच्या 98व्या वर्षी नागपुरात अखेरचा श्वास


5. माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा भाजप प्रवेश निश्चित, उद्या दुपारी 12 वाजता शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश करणार


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 20 डिसेंबर 2020 | रविवार | ABP Majha



6. 24 ते 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील हॉटेल्स रात्री दीडपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी द्या, आहार संघटनेची मागणी


7. मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाची माळ भाई जगताप यांच्या गळ्यात, नव्या कार्यकारणीत मिलिंद देवरा, संजय निरुपमांना संधी नाही


8. कांजूर कारशेडचा वाद कोर्टात गेल्यानं मेट्रो 3 च्या कारशेडसाठी अनेक पर्याय, राज्य सरकारकडून अनेक जागांची चाचपणी सुरु


9. कोरोना लस टोचून घेणं अनिर्वाय नाही, प्रत्येकाच्या इच्छेवर निर्णय अवलंबून, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण


10. अॅडिलेड कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, भारतीय फलंदाजांचं ऑस्ट्रेलियासमोर अवघ्या 36 धावांत लोटांगण