देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. महाराष्ट्रातील कोरोनाचं संकट गडद, पहिल्यांदाच एका दिवसात 552 रूग्णांची भर, राज्यात 4200 तर मुंबईत 2 हजार 700हून अधिक रूग्ण
2. देशात कोरोना बाधितांचा आकडा 16 हजार पार, आतापर्यंत 519 जणांचा मृत्यू, तर आतापर्यंत 2301 रूग्ण करोनामुक्त
3. अमेरिकेत कोरोनाचे 40 हजारांहून अधिक बळी, गेल्या 24 तासांत दीड हजार मृत्यू, जगभरात कोरोनाचे 24 लाख रूग्ण
4. जंतुनाशक फवारणी ठरू शकते अपायकारक; सॅनिटेशन डोम, टनेलचा वापर न करण्याच्या केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचना
5. आजपासून ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योग अंशतः सुरू होणार; स्थलांतर न करता अडकलेल्या मजूरांना कामाची परवानगी, ईकॉमर्सद्वारे जीवनावश्यक वस्तूंचाच पुरवठा
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 20 एप्रिल 2020 | सोमवार | ABP Majha
6. राज्य महामार्गावर आज मध्यरात्रीपासून टोलवसुली सुरू, माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर टोल, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अधिसूचना जारी
7. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर पूर्णपणे सील, 27 एप्रिलपर्यंत शहरात कर्फ्यू लागू, जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 10 ते 12 सुरू राहणार
8. पालघर सामूहिक हत्याकांड प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, भाजपची मागणी; तर गृहमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
9. नाशकात खासगी डॉक्टरसह दोन कोरोना बाधितांवर गुन्हा दाखल; कोरोनाचा संसर्ग केल्याचा आरोप, नागपूरात एकाच रूग्णामुळे 37 जणांना कोरोनाची लागण
10. मराठी तरुणाचं संशोधन ठरू पाहतंय कोरोना रोगनिदानासाठी 'रामबाण' उपाय, आवाजाचं विश्लेषण करून रोगनिदान करण्याची पद्धत शोधून काढली