स्मार्ट बुलेटिन | 2 जुलै 2020 | गुरुवार | एबीपी माझा


महाराष्ट्रात काल 5 हजार 537 नवे रुग्ण, तर 198 कोरोनाबळींची नोंद, दिवसभरात 2 हजार 243 रुग्ण बरे होऊन घरी
भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 6 लाखांच्या वर तर जगभरात एक कोटी आठ लाख कोरोनाबाधितमुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक, दिव्यांगासह 55 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना सूट तर सोमावारपासून बायोमेट्रीक हजेरी


मुंबईत आजपासून 15 जुलैपर्यंत कलम 144 लागू, तर ठाण्यासह, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा भायंदरमध्येही लॉकडाऊन

राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक कोरोनाबाधित, फोर्टिसमध्ये उपचार सुरु


हायवे प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांची एन्ट्री बंद, गडकरींची घोषणा, BSNLआणि MTNLकडून फोर जी टेंडर्स रद्द, अमेरिकेकडून भारताचं कौतुकसीमेवरचा तणाव कमी करण्यावर भारत-चीनमध्ये सहमती, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या लडाख दौऱ्यावर, लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचीही उपस्थिती

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींना लोधी इस्टेटमधील बंगला सोडण्याचे आदेश, एसपीजी सुरक्षा काढल्यानं निर्णय, 1 ऑगस्टपर्यंतची मुदत

कामाठीपुऱ्यातील देह विक्री करणाऱ्या महिलांचं छत्र हरपण्याची वेळ! सरकारकडून मदतीची अपेक्षा

यूपीएससीच्या 4 ऑक्टोबरला होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलता येणार