Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 1 जानेवारी 2020 | बुधवार | ABP Majha

Continues below advertisement


1. एबीपी माझाकडून सर्व प्रेक्षकांना नववर्षाच्या शुभेच्छा, जगभरासह देशभर नववर्षाचं जल्लोषात स्वागत, गेट वे ऑफ इंडियावर मुंबईकरांचं सेलिब्रेशन


2. देवदर्शनाने नागरिकांकडून नवीन वर्षाची सुरुवात, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीत भक्तांची गर्दी, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही भाविक लीन


3. शिवसेनेच्या खिशातल्या कृषी खात्यावर काँग्रेसचा डोळा, तर महसूल खात्यासाठी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण शर्यतीत, विचारसरणीशी तडजोड न करण्याचा हायकमांडचा सल्ला


4. मंत्रिमंडळ विस्तारात अपक्ष आमदारांमुळे शिवसैनिकांची संधी हुकली, 'सामना'च्या अग्रलेखातून खासदार संजय राऊतांची नाराजी


5. भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंना मंत्रिपद न मिळाल्यानं समर्थक आक्रमक, पुण्यातल्या काँग्रेस भवनाची तोडफोड, तर प्रणिती समर्थकांचं सोनियांना रक्तानं पत्र



6. कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ अभिवादनासाठी मोठी गर्दी, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिवादन तर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा


7. केंद्र सरकारकडून NPRचा नवा फॉर्म जारी, नवीन डेटाबेसमध्ये आधार नंबर, पॅन नंबर, वोटर आयडी नंबरसह जवळपास 7 नवीन घटकांचा समावेश


8. नववर्षाच्या पूर्वसंध्येला नागपूरला पावसानं झोडपलं, तर विदर्भातील इतर जिल्ह्यात कडाक्याची थंडी, 3 जानेवारीनंतर पारा आणखी घसरण्याचा अंदाज


9. नववर्षात रेल्वेकडून प्रवाशांना धक्का, मेल आणि एक्स्प्रेसच्या प्रवासी भाड्यात आजपासून वाढ, तर रेल्वेची भाडेवाढ लोकल प्रवासाला लागू नाही


10. साईचरणी वर्षभरात 287 कोटींहून अधिक रकमेचे दान, शिर्डीच्या साई समाधी मंदिराच्या देणगीत मागील वर्षाच्या तुलनेत दोन कोटींची वाढ