स्मार्ट बुलेटिन | 19 मार्च 2019 | मंगळवार | एबीपी माझा

  1. पर्रिकरांच्या निधनानंतर प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री, तर सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई उपमुख्यमंत्रीपदी विराजमान


 

  1. सल्ला नाही, पाठिंबा दिला! एअरस्ट्राईकबद्दलच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास, शरद पवारांकडून सारवासारव


 

  1. नागपुरात वंचित बहुजन आघाडीची जागा कोण लढवणार यावर अद्याप निर्णय नाही, मात्र घोषणेपूर्वीच एमआयएमच्या नेत्याचा उमेदवारी अर्ज


 

  1. चौकीदार श्रीमंतांचे असतात गरिबांचे नाही, बोटयात्रेच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींचा मोदींवर हल्लाबोल


 

  1. प्रियांका गांधी पपी तर नरेंद्र मोदी शेर, देशाचे सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांचं बेताल वक्तव्य




  1. लोकसभा निवडणुकीसाठी आयकर विभाग सज्ज, अवैध व्यवहार आणि काळ्या पैशावर नजर ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था


 

  1. रेल्वे भरतीत परप्रांतीय घुसतील, त्यावर लक्ष ठेवा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश


 

  1. मुंबई सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाईला अटक, चुकीचं स्ट्रक्चरल ऑडिट केल्याच्या आरोपाखाली सदोष मनुष्यवधाचा गुन्हा


 

  1. 14 हजार कोटींचं कर्ज बुडवणारा नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट जारी


 

  1. सोमवारी राजौरीजवळच्या बट्टल परिसरात पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचा एक जवान शहीद