देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. भारत-चीन संघर्षाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेही सहभागी होणार, बैठकीकडे देशाचं लक्ष


2. बीसएनएल आणि एमटीएनलकडूनही चीनसोबतचा करार रद्द, बहिष्कारानं बिथरलेल्या चीनची भारतातील आपल्या सर्व कंपन्या हटवण्याची धमकी

3. 20 जवानांना हालहाल करून मारणं, हे डिवचणं नाही तर काय? सामनातून पंतप्रधान मोदींना सवाल, नेहरूंवर टीका करण्यापेक्षा आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला

4. राज्यात काल कोरोनाचे 3 हजार 752 नवे रुग्ण, एका दिवसातील आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ, तर 1 हजार 672 रुग्ण कोरोनामुक्त

5. जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 85 लाखांच्या पार, तर 44 लाख रुग्ण कोरोनामुक्त, आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 19 जून 2020 | शुक्रवार | ABP Majha



6. वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावर प्रभावी लस येऊ शकते, तर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापरावरही क्लिनिकल ट्रायल सुरु; डब्ल्यूएचओच्या मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांचं
वक्तव्य

7. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मैत्रीण रिया चक्रवर्तीची वांद्रे पोलिसांकडून तब्बल 11 तास चौकशी, यशराज फिल्म्सचे कागदपत्रही तपासणार

8. पंचगंगेची पाणीपातळी 39 फुटांवर गेल्यास नागरिकांचं स्थलांतर, कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती, सध्या पातळी 25 फुटांवर

9. पुण्यात निर्जन ठिकाणी चार महिन्यांची चिमुरडी आढळली, पोलिसांच्या तपासात पित्याचा शोध, आई मात्र अद्याप बेपत्ता

10. नेपाळ नकाशा दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; नकाशात भारताच्या उत्तराखंडमधील कालापानी, लीपूलेख आणि लिम्पियाधुरा भूभागांवर दावा