1. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, 'वन नेशन वन इलेक्शन'वर चर्चा, ममता बॅनर्जींचा मात्र बहिष्कार

2. राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी मोठ्या घोषणा, 2021पर्यंत आंबेडकर स्मारक पूर्ण करण्याचं आश्वासन, तर सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी 775 कोटींचा निधी

3. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, उद्धव ठाकरे-मुख्यमंत्री एकाच मंचावर, वर्धापन दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम

4. नवी मुंबईतल्या सुधागड कॉलेज परिसरात स्फोटकांचा बॉक्स ठेवणारा कॅमेऱ्यात कैद, 'एबीपी माझा'च्या हाती सीसीटीव्ही फुटेज, आरोपीला बेड्या ठोकण्याचं आव्हान

5. अकरावी प्रवेशासाठी SSC विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत 8 टक्के तर इतर शाखेत 5 टक्के जागा वाढवणार, आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

6. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये चमकी तापाचा कहर सुरुच, आतापर्यंत 132 मुलं दगावली, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भेटीदरम्यान नागरिकांचा रोष

7. मोदी सरकार राम मंदिर बांधायला दिरंगाई करत आहे, खासदार सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर

8. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील 'मंत्री' पत्नीसह गजाआड, 25 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी अभिनेते मिलिंद दस्ताने यांना 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी

9. व्हॉट्सअॅपसाठी फिंगरप्रिंट फीचर कार्यान्वित करण्याचा केंद्र सरकारच्या सूचना, फेक मेसेज व्हायरल करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न

10. विश्वचषकात इंग्लंडकडून अफगाणिस्तानचा 150 धावांनी धुव्वा, चौथ्या विजयासह इंग्लंड गुणतालिकेत अव्वल स्थानी