देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये


1. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यभरात एल्गार, ऑगस्ट क्रांती मैदानात डाव्या संघटनांचं केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन, तर अभाविपकडून समर्थनात मोर्चा

2. विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचा चौथा दिवस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देणार, शेतकऱ्यांबद्दल घोषणा करणार का? याकडे राज्याचं लक्ष

3. आधी 'सामना' वाचला असता तर आमच्यासोबत या ठिकाणी असता... विधानसभेतल्या पहिल्या भाषणात आदित्य ठाकरेंची फटकेबाजी, भाजपवर शेलक्या शब्दात ताशेरे

4. नाराज एकनाथ खडसे तूर्तास भाजप सोडणार नसल्याचं स्पष्ट, नागपुरात शरद पवारांची भेट घेतली नसल्याचाही दावा, तर खडसे-पवार भेट झाल्याची नवाब मलिकांची माहिती

5. शिवसेनेकडून जीवाला धोका, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप, गृह सचिव आणि राज्यपालांना सोमय्यांचं पत्र

6. मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महाविकासआघाडीच्या प्रयोगाचे शरद पवारांकडून संकेत, भाजपला दुसरा धक्का देण्यासाठी रणनीती

7.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग संमत, अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात प्रस्ताव मंजूर, सीनेटमध्ये मात्र पुढच्या महिन्यात मतदान

8. रेशन दुकानावर मटण, चिकन, आणि मासे विकण्याचा केंद्र सरकारचा मानस, गरिबांना स्वस्तात प्रथिनयुक्त पदार्थ मिळण्यासाठी प्रस्ताव, अद्याप अंतिम निर्णय नाही

9. 'हिटमॅन' रोहित शर्माचा आणखी एक विक्रम, एकाच वर्षात सात शतकं ठोकून गांगुली, जयसूर्याशी बरोबरी तर धोनी, विराटचे रेकॉर्ड मोडले

10. वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा वन डे सामना जिंकून टीम इंडियाची मालिकेत बरोबरी; रोहित शर्मा आणि लोकेश राहुलची शतकं, कुलदीप यादवची हॅटट्रिक साजरी