Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 14 डिसेंबर 2019 | शनिवार

1. ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा, उद्या पुण्यात अंत्यसंस्कार

2. शेतकरी कर्जमाफी मार्च आणि एप्रिल अशा दोन टप्प्यात, सूत्रांची माहिती, कर्जमाफीच्या आढाव्यासाठी सरकारकडून पथकाची नियुक्ती, बँकांकडूनही माहिती मागवली

3. भाजपवर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंची नागपुरात शरद पवारांसोबत गुफ्तगू, राजकीय चर्चांना उधाण, खडसे-पवार भेट वैयक्तिक असल्याचा नवाब मलिक यांचा दावा

4. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दाखल झालेल्या 59 याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, तर कायदा मागे घेण्याची विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी, अमित शाहांचा मात्र नकार

5. जामियामधला हिंसाचार जालियनवाला बाग हत्याकांडांची आठवण करुन देणारा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोदी सरकारवर ताशेरे, देशातील तरूणांना बिथरवू नका, ठाकरेंचा इशारा



6. जामियातील हिंसाचाराची तुलना जालियनवाला बागेशी करणे हा शहीदांचा अपमान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना उत्तर

7. नागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार, जीवघेण्या हल्ल्यात महापौर थोडक्यात बचावले, पोलिसांचा तपास सुरु

8. नागपूरमध्ये आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मध्यरात्री दारु पिऊन दोन-तीन तरुणांचा आमदार निवासात घुसून गोंधळ, पैशांची मागणी

9. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना मृत्यूदंड, राष्ट्रद्रोहाच्या आरोपानंतर पाकिस्तानमधील विशेष कोर्टाकडून शिक्षा

10. विशाखापट्टणममध्ये आज भारत-वेस्ट इंडिज दुसरा एकदिवसीय सामना, मालिकेत कमबॅक करण्यासाठी टीम इंडिया सज्ज
नागपूरमध्ये आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काल मध्यरात्री दोन-तीन तरुण दारुच्या नशेत आमदार निवासात घुसले. तिथे त्यांनी मोठा गोंधळ घातला. तसेच पैशांची मागणीदेखील केली.