देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. पुढचे 20 दिवस मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; कृष्णा-पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल, 21 तारखेपर्यंत मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा


2. विदर्भात पावसाचं धुमशान, मराठवाड्यातही पावसाची जोरदार हजेरी; जालन्यात पाण्याखाली गेलेल्या पुलावरचा प्रवास दुकाचाकीस्वारांच्या अंगाशी

3. मुंबईतील वांद्रे येथे निवासी इमारतीवर जीर्ण निवासी इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात यश

4. बोईसरमधील केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला; दोघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

5.अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, आज निकालाची शक्यता; परीक्षा घेण्याबाबत यूजीसीसह केंद्र सरकारही आग्रही

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 ऑगस्ट 2020 | मंगळवार | ABP Majha



6. कोरोनाविरोधात पुणेकरांची प्रतिकारशक्ती वाढली, 51 टक्के नागरिकांमध्ये अॅन्टीबॉडीज; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशनचा सर्वे

7. कोरोनापासून बचावासाठी वापरल्या जाणाऱ्या मास्कविरोधात सोशल मीडियावर मोहीम, मास्क निरूपयोगी; संक्रमण रोखण्यासाठी अपयशी असल्याचा सूर

8. नागपुरातल्या व्यापाऱ्यांची तुकाराम मुंडे यांच्यांविरोधात उद्या शहर बंदची हाक, आयुक्तांकडून व्यापाऱ्यांसाठी वेगवेगळे परवाने बंधनकारक; व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध

9. तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची भेट आमीर खानला महागात, सोशल मीडियावर मिस्टर परफेक्शनिस्ट ट्रोल

10. आयपीएल भारताबाहेर खेळवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, आज सुनावणी; देशाला मोठं आर्थिक नुकसान होणार असल्याचा याचिकेत दावा