- आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात प्रवेश नाही; प्रमुख मंदिरातील घटस्थापना एबीपी माझावर लाईव्ह
- परतीच्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण संकटात, तात्काळ पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
- केवळ घोषणा नको, ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्या; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
- महिला प्रवाशांच्या लोकल प्रवासाल राज्य सरकारकडून हिरवा कंदिल, मात्र रेल्वेच्या अंतिम मंजूरीपर्यंत सरसकट महिलांना लोकल प्रवास करता येणार नाही
- आता व्यायाम शाळांसाठी दसऱ्याचा मुहूर्त नक्की करा; जिम मालकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात 27 ऑक्टोबरला सुनावणी, खंडपीठाच्या निर्णयाकडे सकल मराठा समाजाचं लक्ष
- नीट परीक्षेचा निकाल जाहीर; ओडिशाच्या शोएब आफताबने रचला इतिहास, नीट परीक्षेत 720 पैकी 720
- पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी सुरुच असल्यानं संबंध सुधारणे खूप कठीण, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं वक्तव्य
- नवरात्रीनिमित्त ई-कॉमर्स वेबसाइटवर बंपर सेलला सुरुवात, अॅमेझॉन, फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट
- मुंबईचा कोलकातावर 8 गडी राखून दमदार विजय, डि कॉकची 78 धावांची स्फोटक खेळी; पॉईंट टेबलमध्ये मुंबई अव्वल स्थानी