- विधानसभेसाठी भाजपचा अंतर्गत सर्व्हे माझाच्या हाती, 122 जागांवर विजयाचं भाकीत, तर परळीत पंकजा मुंडे, वांद्र्यात आशिष शेलार, राम शिंदेंच्या कर्जत जामखेडमध्ये टफ फाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंकजा मुंडेंच्या परळीत, मुख्यमंत्र्यांच्या सहा तर उद्धव ठाकरेंच्या तीन सभा तर शरद पवार नाशिक जिल्ह्यात
- 15 नोव्हेंबरपर्य़ंत राममंदिर प्रकरणी अंतिम निकाल, 40 दिवसांच्या युक्तिवादानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला, सुनावणीवेळी कोर्टात नाट्यमय घडामोडी
- पाठीत वार करणाऱ्यांपासून सावधान, कणकवलीत नारायण राणेंवर प्रहार करताना उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा, तर निलेश राणेंची ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंवर टीका
- जागावाटपात नमतं घ्यावं लागलेल्या शिवसेनेचा राज ठाकरेंकडून समाचार, नाशिकमधल्या सभेत अनेकांची खिल्ली, नाशिकमधील पराभव जिव्हारी लागल्याची खदखद व्यक्त
- 13 वर्ष मंत्रीपद दिल्यानंतर काम करता येणार नसेल तर बांगड्या भरा, शरद पवारांची माजी मंत्री बबनराव पाचपुतेंवर टीका
- देशाच्या भावनेला विरोधक समजून घेत नाहीत, काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्येकी 10-10 जागा मिळतील, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, मोदींच्या राज्यात तीन सभा
- वाहन तपासले म्हणून परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचा संताप, वर्ध्यात कर्मचाऱ्यांवर आगपाखड
- बार्शीतील बंडखोर उमेदवार राजेंद्र राऊतांविरोधात गुन्हा, आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांची तक्रार
- पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपींवर कारवाई करण्यासाठी ईडीचा विशेष न्यायालयात अर्ज, आरोपींचा ताबा मिळवण्यासाठी अर्ज