मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेनुसार राज्यात भाजपला मोठ्या विजयाचा विश्वास आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 164 जागांपैकी भाजपने 122 जागांवर विजय निश्चित मानला आहे. तर 40 जागांवर अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 2 मतदारसंघात भाजपचा पराभव होणार, असा अंदाज या सर्व्हेमध्ये नोंदवण्यात आल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे.


भाजपच्या या सर्व्हेनुसार बारामती आणि मालेगाव मध्य या दोन मतदार संघांमध्ये भाजपचा पराभव होणार आहे. बारामतीत अजित पवार निवडणूक जिंकतील तर मालेगावमध्ये कांग्रेसचे विद्यमान आमदार आसीफ शेख जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, ही निवडणूक भाजपच्या 40 उमेदवारांसाठी खडतर आहे. त्यामध्ये चार विद्यमान मंत्र्यांचा समावेश आहे. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघात त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून जोरदार फाईट मिळणार आहे. त्याचबरोबर शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांच्याकडून जोरदार फाईट मिळेल, असा अंदाज भाजपच्या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच मंत्री राम शिंदे यांना कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवार यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षित आहे. तसेच परिणय फुके यांना साकोली मतदारसंघात काँग्रेसच्या नाना पटोलेंकडून मोठं आव्हान आहे. या दोघांमध्ये मोठी फाईट पाहायला मिळेल.

सर्व्हे पाहा