1. सकाळी 11 वाजता चौथ्या लॉकडाऊनची नियमावली जाहीर होणार, हॉटस्पॉटमधले निर्बंध वाढण्याची शक्यता, अर्थचक्राला गती देण्याचं महाराष्ट्रासमोर आव्हान 2. राज्यात काल दिवसभरात 1 हजार 606 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 67 रुग्णांचा मृत्यू, एका दिवसातली सर्वाधित वाढ, कोरोनााधितांचा आकडा 30 हजारापार 3. मुंबई-गोवा मार्गावर खारेपाटणजवळ वाहनांच्या लांब रांगा, तपासणी बंद झाल्यानं रात्रभर चाकरमानी ताटकळत 4. उद्यापासून नवी मुंबई एपीएमसीतील भाजी-धान्य मार्केट सुरू होणार, तर गुरूवारपासून फळ आणि कांदा-बटाटा मार्केट चालू होणार
5.कोरोनामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या शहरांमधील स्मशानभूमीवरचा ताण वाढला, दादरच्या शिवाजी पार्क विद्युतदाहिनीत मृतदेह आणण्यास स्थानिकांचा विरोध
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 मे 2020 | रविवार | ABP Majha
