देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...




  1. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप, शेतकरी संघटनांशी चर्चेसाठी समिती नेमण्याच्या सूचना



  1. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सिंघू बॉर्डवर संत बाबा राम सिंह यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या



  1. देशातील कृषी उत्पादकांना केंद्र सरकारची गोड भेट, 60 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय



  1. नव्या कृषी कायद्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक, त्रुटी आणि उणिवा यांचा अभ्यास करणाऱ्या उपसमितीसोबत चर्चा करणार



  1. राज्य सरकारचा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा



  1. जेईई मेन्स परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 2021 या चार सत्रांमध्ये परीक्षा घेतल्या जाणार



  1. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्यास अर्णब गोस्वामी यांना हायकोर्टाची परवानगी



  1. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 18 गावांचा पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत समावेश करा; हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका



  1. भारतात कोरोनातून रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 96 टक्क्यांवर; तर महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट



  1. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी मालिकांसाठी टीम इंडिया सज्ज, मालिकेतली डे-नाईट पहिला सामना आजपासून एडिलेडवर