देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. राज्यात आजपासून भक्तांसाठी मंदिरं खुली, अटी-शर्थींचं पालन बंधनकारक, प्रमुख देवस्थानांकडून ऑनलाईन बुकींगची सोय


 

  1. प्रशासनाचा लेखी आदेश न मिळाल्याने वसई-विरारमधील चर्च बंद राहणार, शेगावच्या गजानन महाराज मंदिरातही आज दर्शन नाही


 

  1. आज सकाळी 11 वाजता ढोल ताशे वाजवत आणि गुलाल उधळत सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला जाणार, भाजप आमदार राम कदम यांची ट्विटरवरून माहिती


 

  1. भाजपच्या दबावामुळेच मंदिर उघडण्याचा सरकारचा निर्णय, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचं वक्तव्य


 

  1. नितीश कुमार आज बिहारच्या 37 व्या मुख्यमंत्र्याच्या रुपात सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, तर बिहारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता


 

  1. 'मातोश्री'वर आंदोलनाला निघालेले राणा दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात; मुख्यमंत्र्यांना आमची भीती वाटते का? नवनीत राणांचा सवाल


 

  1. कोरोना काळातील वाढील वीजबिलांबाबत दिलासा नाही, थकीत बिल वसूल करण्याचे महावितरणाचे निर्देश; टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सुविधा


 

  1. बीड अॅसिड हल्ला प्रकरण, प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक; तर खटला 'फास्ट ट्रॅक कोर्टा'त चालवण्यासंदर्भात सूचना दिल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती


 

  1. बेस्टच्या खात्याच अत्याधुनिक डबल डेकर बस दाखल होणार; 100 बससाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात, प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा


 

  1. मुंबईत दिवाळीत गेल्या 17 वर्षातील सर्वात कमी ध्वनी प्रदूषण, फटाके न फोडण्याच्या सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद