देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, मै पल दो पल का शायर हूँ... निवृत्ती जाहीर करताना धोनीची भावूक पोस्ट


 

  1. महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निवृत्ती जाहीर


 

  1. निवृत्तीनंतर धोनी कृषी जगतात पाऊल ठेवण्याची शक्यता, खताचा जागतिक ब्रॅण्ड बाजारात आणण्याचे संकेत; तसेच प्रतिभावान खेळाडू तयार करण्याचाही संकल्प


 

  1. गणेशोत्सवासाठी सोडलेल्या ट्रेनला थंड प्रतिसाद, 18 डब्यांच्या ट्रेनमध्ये फक्त 62 प्रवासी; राज्य सरकार आणि रल्वे प्रशासनाचं नियोजन चुकल्याचा सूर


 

  1. पुढील आठवड्यापासून आंतरजिल्हा एसटी सेवा सुरु करण्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांचे संकेत, तर कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्रही सुरु होण्याची शक्यता


 

  1. राज्यात शाळेआधी कोचिंग क्लासेसचे दरवाजे उघडण्याची शक्यता, लवकरच स्पर्धा परीक्षा केंद्रही सुरु होणार


 

  1. सिरमच्या 'कोविशिल्ड' लसीची चाचणी पुढच्या आठवड्यापासून, देशभरातील सोळाशे जणांवर प्रयोग होणार, मुंबईतील 2 तर पुण्यातील एका रुग्णालयाची निवड


 

  1. बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिलेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवलं; पारनेर मधील घटना


 

  1. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून ऑरेंज अर्लट जारी; कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातल्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ


 

  1. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीं आज दुसरी पुण्यतिथी, मान्यवरांकडून अटलजींना श्रद्धांजली