देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. सध्याच्या गतीनं लसीचं उत्पादन सुरु राहिलं, तर प्रत्येकाला लस मिळण्यासाठी 2024 उजाडेल; सीरमचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांचं मोठं वक्तव्य
2. केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर बंदी, शेतकरी संघटना आणि कांदा उत्पादक आंदोलनाच्या पवित्र्यात, शरद पवार आज पियुष गोयल यांची भेट घेणार
3. राज्यात सप्टेंबर अखेर शाळा सुरु होण्याची शक्यता कमी, राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करण्यात येईल; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
4. कोरोना संकटात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांकडे कोणीही वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू नये; उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा इशारा
5. आग्र्यातील मुघल संग्रहालयाला आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 सप्टेंबर 2020 | मंगळवार | ABP Majha
6. सुशांत ड्रग्ज प्रकरणात सारा अली खानसह बॉलिवूडच्या 25 जणांची नावं हाती नसल्याची एनसीबीची माहिती, तर ड्रग्स खरेदी-विक्री करणाऱ्या 17 जणांना एनसीबीकडून अटक
7. कंगना रनौतचा ट्वीटद्वारे थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा, आदित्य यांच्याशी संबंधित संबंधित लोकांना उघड केल्यानं उद्धव ठाकरेंची गोची झाल्याचा दावा
8. हेरगिरीखोर चीनचं आता भारतीय अर्थव्यवस्थेवरही लक्ष, भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपाठोपाठ स्टार्टअप अॅप्स आणि ई-कॉमर्स कंपन्यांवर चीनची पाळत, इंडियन एक्सप्रेसचं वृत्त
9. जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 2.94 कोटींवर, आतापर्यंत 9 लाख 32 हजार रुग्णांचा मृत्यू, तर आतापर्यंत 2 कोटी 12 लाख रुग्ण कोरोनामुक्त
10. बुलडाण्यातील उतावीळ नदीवरच्या धरणाच्या सांडव्यावरती लोकांची गर्दी, धिंगाणा घालणाऱ्या लोकांवर कारवाई होणार, पोलिसांकडून एबीपी माझाच्या बातमीची दखल