1. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात, रुग्णांचा आकडा तब्बल ३१ वर, नागपूर, यवतमाळ, रायगड, पिंपरीमध्ये नवे रुग्ण आढळल्यानं खळबळ                    

  2. ग्रामपंचायत क्षेत्र सोडून राज्यातल्या सर्व शाळा आणि कॉलेज 31 मार्चपर्यंत बंद, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय, खासगी क्लासेस आणि मॉल्सही बंद ठेवण्याचे आदेश

  3. शक्य असल्यास लग्न आणि समारंभ पुढे ढकला, पुणे विभागीय आयुक्तांचं आवाहन, पुढील आदेशापर्यंत शासकीय, धार्मिक, व्यावसायिक कार्यक्रम रद्द करण्याचे सरकारचे निर्देश

  4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टात विनाकारण गर्दी करू नका, प्रभारी मुख्य न्यायमूर्तींचे आदेश; पुढील आठवडाभर केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी घेण्यात येणार

  5. कोरोनामुळं मनसेचा पाडवा मेळावा रद्द, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा लंडन दौराही स्थगित, बंगळुरुतील संघाची प्रतिनिधी सभाही रद्द

  6. इराणमधल्या 234 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान मध्यरात्री परतलं, तर इटलीतले भारतीय नागरिकही भारताच्या दिशेने, सर्वांना 14 दिवस देखरेखीखाली ठेवणार

  7. कोरोना व्हायरसवर लवकरच लस येणार; विषाणू शरीराबाहेर ठेवण्यात पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी संस्थेला यश, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांची माहिती

  8. मध्य प्रदेशमध्ये उद्या कमलनाथ सरकारचं बहुमत परीक्षण, फ्लोर टेस्टचं व्हीडिओ रेकॉडिंग करण्याचे राज्यपालांचे आदेश

  9. तुमच्या हातातला मोबाईल महागणार, मोबाईलवरचा जीएसटी 12 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर, जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्र्यांची घोषणा

  10. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील गैरव्यवहारप्रकरणाची चौकशी होणार, विधानपरिषदेत ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती