स्मार्ट बुलेटिन | 14 मार्च 2019 | गुरुवार | एबीपी माझा
1. मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्टेशनलगतच्या पूल दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू तर 31 जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
2. पूल दुर्घटनेत जीटी रुग्णालयातील 3 परिचारिकांचा मृत्यू, वडिलांसोबत गेलेल्या झायेद खानवरही काळाचा घाला, रेड सिग्नल सुरु असल्यानं मोठा अनर्थ टळला
3. ऑडिटदरम्यान पुलाची किरकोळ दुरुस्ती सुचवण्यात आल्याची विनोद तावडेंची माहिती, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत
4. कोसळलेला पूल मुंबई महापालिकेचाच असल्याची अधिकाऱ्यांची कबुली, मध्य रेल्वेसह मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा, निष्काळजीमुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका
5. बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी, सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची सरकारवर टीका
6. अर्जुन खोतकरांबद्दल दोन दिवसात गूड न्यूज, खोतकरांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार यांचा गौप्यस्फोट, रावसाहेब दानवेंच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं
7. नरेंद्र मोदी दुबळे पंतप्रधान, चीनच्या अध्यक्षांना घाबरतात, चीनच्या भारताविरोधातील कारवाईवर मोदी एक शब्दही बोलत नसल्याची राहुल गांधींची टीका
8. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला जागा, निधी देणं हा प्रशासनाचा धोरणात्मक निर्णय, याला न्यायालयात आव्हान देणं चुकीचं असल्याची राज्य सरकारची भूमिका
9. पुण्यातील कोंढवा परिसरातील तालाब कंपनीजवळ प्लॅस्टिकच्या गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात, आगीत स्कूल व्हॅन आणि रिक्षा जळून खाक
10. क्रिकेटर मोहम्मद शमीविरोधात हुंडा आणि लैंगिक छळाचा गुन्हा दाखल, पत्नीच्या तक्रारीनंतर कारवाई, मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ