1. तांत्रिक कारणांमुळे चांद्रयान-2चं प्रक्षेपण इस्रोनं थांबवलं, क्रायोजेनिक इंजिनमध्ये इंधन भरताना अडचणी, प्रक्षेपणासाठी इस्रो नवी तारीख जाहीर करणार
 
  1. क्रिकेट जगताला मिळाला नवा विश्वविजेता, आधी 50-50 आणि नंतर सुपर ओव्हरमध्ये अंतिम सामना टाय, सर्वाधिक चौकारांच्या निकषानुसार इंग्लंड विश्वविजेता
 
  1. तब्बल 5 तासांच्या लढतीनंतर सर्बियाच्या ज्योकोविचची स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररवर मात, ज्योकोविचला सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचं विजेतेपद
 
  1. राज्यात विधानसभेसाठी 10 सप्टेंबरपासून आचारसंहिता तर 10 ऑक्टोबरपासून निवडणुका, गिरीश महाजनांनी सांगितला विधानसभेचा मुहूर्त, दिवाळीआधीच विधानसभेचं बिगुल वाजण्याचे संकेत
 
  1. काँग्रेसचं इंजिन खराब झालेलं, विजयापर्यंत ते पोहोचणार नाही, सुधीर मुनगंटीवारांचा टोला, महायुतीचा मुख्यमंत्री होणार असल्याचाही विश्वास
 
  1. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही, शिक्षण शुल्काची 50 टक्के प्रतिपूर्ती देणार असल्याचंही स्पष्टीकरण
  1. राहुल गांधींच्या राजीनाम्याला 50 दिवस पूर्ण, अध्यक्षपदावर तोडगा न निघाल्याने काँग्रेससमोर मोठा पेच
 
  1. मुंबईच्या नायर रुग्णालयात रुग्ण दगावल्याने नातेवाईकांचा तीन निवासी डॉक्टरांवर हल्ला, रुग्णालयाचीही तोडफोड, डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
 
  1. अहमदाबादमध्ये आकाशपाळणा कोसळून दोघांचा मृत्यू, तर 29 जण जखमी, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद
 
  1. घरी असताना फावल्या वेळेत काय करता हे सरकारला सांगावं लागणार, केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून सर्व्हेला सुरुवात