1. देशात आजपासून 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर निर्बंध, हॉलमार्कच्या प्रक्रियेसाठी वर्षाची मुदत, नियम मोडल्यास सराफाला 1 वर्षाची शिक्षा आणि 5 लाखांचा दंड
2. फास्टॅग स्कॅन न झाल्यास टोलनाक्यावर फुकटात प्रवास, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अधिसूचना, तर फास्टॅग नसल्यास दुप्पट भुर्दंड
3. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांचं हायकोर्टात शपथपत्र, सर्व प्रकरणं मागे घेण्याची विनंती नागपूर खंडपीठाला विनंती
4. सरकारच्या नावातून शिव शब्द का काढला? पुस्तकप्रकरणी टीका करणाऱ्या सरकारवर उदयनराजेंचा पलटवार, जाणता राजावरुन पवारांवरही हल्लाबोल
5. मुंबईतल्या वाडिया रुग्णालयाला 46 कोटींचं अनुदान, मुख्यमंत्र्यांची महापौर-ट्रस्टींसोबत, तर शर्मिला ठाकरेंची अजितदादांसोबत बैठक, अनियमिततेची चौकशी होणार
6. शिवभोजन योजनेचा 26 जानेवारीला शुभारंभ, राज्यात 50 ठिकाणी केंद्र उभारणार, पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार शिवभोजन योजनेचा शुभारंभ
7. 26 वर्षीय विद्यार्थ्यांचा ह्रदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू, मुंबईच्या सोमय्या कॉलेजमधील घटना, फुटबॉल खेळून पाणी प्यायल्याने चक्कर
8. मंदी, बेरोजगारीपाठोपाठ महागाईचा ताप, भाजीपाला, दूध, डाळी, महागल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलं, 5 वर्षांतील उच्चांकावरून काँग्रेसचं टीकास्त्र
9. मकरसंक्रातीच्या निमित्तानं देशभर उत्साह, येवल्यात पंतगउत्सव तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पंतगबाजी करण्यात दंग
10. वानखेडेवर अॅरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरचा धुमाकूळ, फिंच-वॉर्नरच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा दहा विकेट्सनी धुव्वा, कांगारुंची मालिकेत आघाडी