2. हिंमत असेल तर कलम 370 पुन्हा लागू करण्याची घोषणा करा, पंतप्रधान मोदींचं थेट आव्हान, तर कर्जमाफी, बेरोजगारी आणि मंदीवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
3. नटरंगासारखं वागणं जमत नाही, शरद पवारांच्या हातवाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर, तर कार्यकर्त्याला कोपर मारणाऱ्या पवारांच्या व्हिडीओचा नरेंद्र मोदींकडून समाचार
4. आर्थिक हितसंबंधांसाठी शिवसेना मंत्र्यांची राजीनाम्याची धमकी, राज ठाकरेंचा आरोप, शिवसेना-भाजपच्या विकासकामांच्या जाहिरातींवरही टीका
5. शिवसेनेवरुन नारायण राणेंच्या मुलांमध्ये दुफळी, नितेश राणेंची मवाळ भूमिका तर निलेश राणेंचा मात्र आक्रमक पवित्रा कायम
6. राम मंदिर प्रकरणात आजपासून शेवटच्या आठवड्याची सुनावणी, येत्या महिनाभरात निकाल येण्याची शक्यता, आयोध्येत कलम 144 लागू
7. एअर इंडियाच्या 120 वैमानिकांचा राजीनामा, पदोन्नती आणि वेतनवाढ होत नसल्याने निर्णय, विमान फेऱ्या नियमित सुरु ठेवण्याचं कंपनीसमोर आव्हान
8. जपानमधील हागीबीस चक्रीवादळात 25 जणांचा मृत्यू तर 15 जण बेपत्ता, मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न, पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरु
9. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष होण्याची शक्यता, मुंबईतील बैठकीत गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती
10. भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला डच ओपनच्या विजेतेपद, अंतिम फेरीत जपानच्या युसुके ओनोदेराचा पराभव