स्मार्ट बुलेटिन | 14 मार्च 2020 | शनिवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

Continues below advertisement
  1. भारतात कोरोनाचा दुसरा बळी, दिल्लीत महिलेचा मृत्यू, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 82 वर तर राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 19 वर
  2. महाराष्ट्रसह अन्य चार राज्यांमध्ये कोरोनामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचं बनावट पत्र व्हायरल, पत्रावर विश्वास न ठेवण्याचं राज्य सरकारचं आवाहन
  3. पुणे, पिंपरीमधील शाळा, कॉलेजेस आजपासून बंद, मुख्यमंत्र्यांचे आदेश, तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरातील जिम, जलतरण तलाव आणि सिनेमा-नाट्यगृह बंद राहणार
  4. घरी बसूनच काम करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन,  वर्कफ्रॉम होमसाठी हायकोर्टातही याचिका, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये शाळा-कॉलेजसना सुट्टी
  5. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तू, केंद्र सरकारकडून घोषणा, काळाबाजार करणाऱ्यांना 7 वर्षांची शिक्षा
  6. अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून 50 अब्ज डॉलरची तरतूद
  7. कोरोना व्हायरसमुळे भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यांची मालिका रद्द, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय
  8. येस बँकेच्या धसक्यानंतर सरकारी निधी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याचं राज्याचं धोरण, वेतन, पेन्शनसह सर्व योजनांची खाती 1 एप्रिलपासून राष्ट्रीय बँकेत
  9. मुंबई मेट्रोच्या कामासाठी 159 झाडं तोडण्याच्या प्रस्तावाला महापालिकेची मंजुरी, मेट्रो 2 आणि मेट्रो 7च्या कामाचा मार्ग मोकळा
  10. लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा, स्मारकाबाबतचा खटला महाराष्ट्राने जिंकला
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola