स्मार्ट बुलेटिन | 14 मार्च 2019 | गुरुवार | एबीपी माझा

  1. . मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी नाही, चीनच्या आडकाठीमुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने प्रस्ताव फेटाळला


 

  1. भारतीय हद्दीजवळून दोन पाकिस्तानी विमानांची उड्डाणं, वायु दल आणि रडार यंत्रणा हायअलर्टवर, एएनआयच्या हवाल्यानं वृत्त


 

  1. लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार


 

  1. भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये, मित्रपक्ष शिवसेनेचा भाजपला सल्ला


 

  1. मुलंच नाही तर नातवंडही पळवू, सुजय विखेंना भाजप प्रवेशानंतर गिरीश महाजनांचा ‘माझा’च्या तोंडी परीक्षेत इशारा


VIDEO



  1. पक्षाने जबाबदारी द्यावी, माझ्याकडे स्किल आहे, बारामती जिंकून दाखवेन, ‘माझा’च्या तोंडी परीक्षेत गिरीश महाजनांचं वक्तव्य


 

  1. युतीचा निवडणुकीचा पूर्ण आराखडा तयार होतो, आघाडीत मात्र चर्चाच संपत नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची टीका


 

  1. आपल्याशी बोलण्यापेक्षा पत्नी मोबाईलवर 'पाकिस्तानी ड्रामा' पाहण्यास महत्त्व देत असल्याने संताप, पुण्यात पतीचा पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला


 

  1. गायकवाड समितीचा अहवाल परिपूर्ण, मराठा आरक्षण समर्थक याचिकाकर्त्यांचा मुंबई उच्च न्यायालयात दावा


 

  1. दिल्लीच्या निर्णायक वन डेत टीम इंडियाचा 35 धावांनी पराभव, ऑस्ट्रेलियानं मालिका 3-2 ने जिंकली