देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...



  1. मुंबई, अलिबागमधील मुसळधार पावसामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रायगड दौरा रद्द, तर वादळग्रस्तांच्या मदतीत सरकार अपयशी ठरल्याचा फडणवीसांचा आरोप

  2. मान्सून आज मुंबईसह महाराष्ट्राचा उर्वरित भाग व्यापणार, हिंगोलीतील नंदापूर रेल्वे पुलाखाली पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला

  3. राज्यात काल दिवसभरात 3 हजार 427 नव्या रुग्णांची भर, एकूण आकडा 1 लाख 4 हजार 568 वर, तर एकट्या मुंबईत 56 हजार 831 रुग्ण

  4. अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरीचा समावेश असलेला के पूर्व वॉर्ड ठरतोय मुंबईतील नवा हॉटस्पॉट, वॉर्डात कोरोनाचे एकूण 3 हजार 782 रुग्ण

  5. 15 जूनपासून शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीबद्दल शिक्षण अधिकाऱ्यांचाच गोंधळ, शिक्षण संचालकांना मार्गदर्शन करण्याचे शिक्षण अधिकाऱ्यांचे पत्र

  6. मुंबईबाहेरून येणाऱ्या कोविड योद्धांना स्थानिकांनी वेगळ ठेवण्याची मागणी करणं चुकीचं', मुंबई उच्च न्यायालयानं याचिका फेटाळली

  7. गैरहजर राहिल्यामुळे सोलापुरातील 133 वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हे, 238 कर्मचाऱ्यांना आज दुपारपर्यंत कामावर हजर राहण्याची मुदत

  8. मुंबईत आतापर्यंत 91 कोरोना योद्ध्यांचा बळी, काल 4 पोलीस कर्मचारी दगावले, मुंबई पालिकेच्या 65 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

  9. खासदार संभाजीराजे छत्रपतींनी शेअर केला शेतात तिफण ओढतानाचा व्हीडिओ, करवीर तालुक्यातील केर्ले गावात शेतकऱ्यांसोबत घेतला पेरणीचा अनुभव

  10.  कालापानी, लिपूलेख, लिंपियाधुरावरचा नेपाळचा दावा भारताकडून अमान्य, नेपाळकडे दस्तऐवज नाहीत, भारताचं स्पष्टीकरण


Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 14 जून 2020 | रविवार | ABP Majha