देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. राजस्थानमधील सत्तासंघर्ष अजूनही कायम, समर्थन आहे तर विधानसभेत बहुमत सिद्ध करा, सचिन पायलट यांचं आव्हान, सूत्रांची माहिती

2. राजस्थानमधील सत्तापेचावर आज पुन्हा काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक, सचिन पायलट यांच्यासह इतर आमदारांना सहभागी होण्याचं आवाहन

3. कोरोनाच्या संकटात विद्यापीठ परीक्षा घेणं शक्य नाही, उदय सामंत यांचा पुनरुच्चार, तर परीक्षा न घेता पदव्या देणं अयोग्य, यूजीसीची प्रतिक्रिया

4. राज्यात काल दिवसभरात 6 हजार 497 नवे कोरोनाग्रस्त, तर देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या नऊ लाखांच्या पार

5. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात, दुकानं सुरु ठेवण्यावर नऱ्हेतील व्यापारी ठाम, पिंपरीतील उद्योग, आयटी कंपन्या सुरु

6. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लातूरमध्ये उद्यापासून 15 दिवसांचा लॉकडाऊन, किराणा मालासह भाजीपाला मार्केटही बंद राहणार

7. महाराष्ट्राच्या दौर्‍यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; कोरोना चाचण्या, आरोग्य व्यवस्थेसंदर्भात सूचना, चर्चेची तयारी असल्याचीही माहिती

8. गणेशोत्सवाच्या धर्तीवर बकरी ईदलाही परवानगी द्या, काँग्रेस नेते नसीम खान यांची मागणी, महाआघाडीत पुन्हा धुसफूस होण्याची शक्यता

9. भारत-चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तराच्या अधिकाऱ्यांमध्ये आज चर्चेची चौथी फेरी, सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेविषयी पुढचं सूत्र ठरणार

10. भगवान राम भारताचे नाही तर नेपाळचे, खरी अयोध्या नेपाळमध्ये, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा अजब दावा