1. देशातील लॉकडाऊन आणखी 19 दिवसांनी वाढला, 3 मे पर्यंत भारत लॉकडाऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
2. कोरोनाच्या संकटाला धैर्याने सामोरं हीच खरी देशभक्ती, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांचे आभार
3. देशभरात 9 हजार 352 जणांना कोरोनाची लागण, 324 जणांचा मृत्यू, कोरोनाचे सर्वाधिक 2234 रुग्ण महाराष्ट्रात तर मुंबईत काल दिवसभरात 242 नवे रुग्ण
4. महावितरणच्या ग्राहकांना सरकारकडून दिलासा, मार्च-एप्रिल महिन्याचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आदेश
5. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला डॉक्टरांचा प्रतिसाद, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी 'टास्क फोर्स' सज्ज, सरकारला उपचारांबाबत मार्गदर्शनही करणार
6. विद्यापीठांच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही, विद्यार्थ्यांमधील संभ्रमानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण
7. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 129वी जयंती, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महामानवाला अभिवादन
8. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच थांबून आंबेडकर जयंती साजरा करा, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं राज्यातील जनतेला आवाहन
9. नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये दोन कोटी रुपयांचा कडधान्याचा साठा जप्त, अन्न, नागरी पुरवठा विभागाची सर्वात मोठी कारवाई
10. सांगली जिल्ह्यात आजपासून मास्क अनिवार्य, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य सीमेवर आणखी कडक अंमलबजावणी सुरु होणार