देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...



    1. मंदिरं उघडण्यासाठी भाजपचं आज राज्यभरात आंदोलन; भाजप नेते आणि कार्यकर्ते गावागावांत आंदोलन करणार

    2. बॉलिवूडची बदनामी करणाऱ्या चॅनलविरोधत बॉलिवूड एकवटलं; सलमान, शाहरुख, अजय देवगनसह इतर स्टार्सची  दिल्ली हायकोर्टात याचिका

    3. दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची ‘उत्सव’ योजना; तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये आगाऊ देण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा

    4. मुंबईतील वीजपुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार, आपत्तींवरच्या उपायांबाबत महाराष्ट्र सरकारला मार्गदर्शन करणार

    5. सलग तिसऱ्या दिवशी पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपलं, हातातोंडाशी आलेली पिकं गेल्याने शेतरकऱ्यांचं मोठं नुकसान

    6. बीडमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; घटनेनंतर आरोपी सावकार फरार, बीड ग्रामीण पोलीसांचा तपास सुरु

    7. परभणीत सात वर्षीय चिमुकल्याचा चुलत आजोबांकडून निर्घृन खून, आरोपी आजोबाला अटक; खूनाचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट

    8. चीन-पाकिस्तान विशिष्ट 'मिशन' अंतर्गत भारताच्या सीमांवर तणाव निर्माण करतायेत,  संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून शंका उपस्थित

    9. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी दणदणीत पराभव; बंगलोरचे गोलंदाज ठरले ठरले विजयाचे शिल्पकार

    10. भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या घरी 'गुड न्युज'! सागरिका-झहीर आई-बाबा बनणार