देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. पंतप्रधान मोदींकडून चौथ्या लॉकडाऊनची घोषणा, नियमांचा तपशील 18 मे पूर्वी जाहीर होणार, नव्या नियमांसह लॉकडाऊन 4 लागू होणार असल्याची माहिती


2. जनतेशी साधलेल्या संवादात पंतप्रधानांकडून 'आत्मनिर्भर भारत अभियान'ची घोषणा, कोरोनाशी लढण्यासाठी 20 लाख कोटींचं विशेष पॅकेज जाहीर


3. पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर पॅकेजवरुन काँग्रेसमध्ये वेगवेगळी मतं, गहलोत- मिलिंद देवरा यांच्याकडून कौतुक तर सुरजेवाला-तिवारी यांचा विरोध


4. राज्यात 1026 नवे कोरोनाबाधित, 53 जणांचा मृत्यू; कोरोनाबाधितांची संख्या 24,427, एकट्या मुंबईत कोरोनाग्रस्तांची आकडा 15 हजारांच्या वेशीवर


5. जगभरात कोरोनाचे साडे 43 लाख रुग्ण, बळींची संख्या दोन लाख 92 हजार, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रुग्णसंख्येत भारत जगात बाराव्या स्थानावर


6. पुण्यात कन्टेंन्मेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रात काही दुकानं सुरु करण्यास परवानगी, वस्तू विक्रीसाठी ठरवून दिलेल्या वारांचे वेळापत्रक


7. राज्यात दारु आता घरपोच मिळणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निर्णय


8. कोरोना काळातही वारंवार गैरहजर किंवा कर्तव्यावर न येणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांवर करणार कारवाई, मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येनंतर आरोग्य यंत्रणांबाबत महत्वाचे निर्देश जारी


9. सरसकट सर्व मुंबईकरांची कोरोना चाचणी करण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली, दारोदारी जाऊन तपासणी करणं प्रशासनासाठी अशक्य असल्याचं मत


10. माझ्यात अजूनही बरंच क्रिकेट शिल्लक आहे, टीम इंडियामध्ये पुनरागमन करणार, रोहित शर्मासोबतच्या लाईव्ह चॅटमध्ये सुरेश रैनाचा विश्वास