देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...




  1. देशातील 13 शहरात कोविशिल्ड लस दाखल, 56 लाख 50 हजार डोस वितरीत; आज 20 शहरांत सीरमकडून कोविशिल्डचं वितरण



  1. सर्वासामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार आज भूमिका मांडणार; चेन्नई पॅटर्न मुंबईत राबवण्याचा विचार, मात्र अंतिम निर्णय नाही



  1. शेतकरी आंदोलनाचा 49वा दिवस; आज तीनही कृषी कायद्यांची होळी करत शेतकरी साजरी करणार लोहडी



  1. माझ्या पतीने आत्महत्या केली तर बच्चू कडू, तहसीलदार, ठाणेदार जबाबदार; सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची तक्रार



  1. नारायण राणेंना त्यांच्या मुलापासूनच खरा धोका,खासदार विनायक राऊत यांचा राणेंना चिमटा



  1. सोनू सूद सराईतपणे कायदे मोडणारा 'गुन्हेगार', बेकायदेशीर बांधकामाबाबत बीएमसीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर



  1. नायलॉन मांजाने गळा चिरल्याने 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू; नागपुरातील रामबाग परिसरातील घटना



  1. अमेरिकेच्या संसदेतील हिंसेची जबाबदारी स्विकारण्यास डोनाल्ड ट्रम्प यांचा नकार, महाभियोगाच्या प्रस्तावावार आज मतदानाची शक्यता



  1. एलन मस्क यांच्याकडून खान अकॅडमीला 5 दशलक्ष डॉलर्सची मदत; ऑनलाईन शिक्षणपद्धतीला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत



  1. सायना नेहवाल आणि एचएस प्रणयचा कोरोना अहवाल निगेटिव्ह; थायलँड ओपनमध्ये सहभागी होणार