1. भाजप नेते जय भगवान गोयलांच्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरुन वादंग, काँग्रेसची पोलिसांत तक्रार, शिवप्रेमींचा भाजपवर हल्लाबोल

    2. नरेंद्र मोदींची तुलना महाराजांच्या वंशजांना मान्य आहे का? संजय राऊतांचा सवाल, तर जीभेला लगाम लावा म्हणत संभाजीराजेंचं प्रत्युत्तर

    3. मनसेनं नव्या झेंड्यावर शिवमुद्रेचा वापर करु नये, आर. आर. पाटील फाऊंडेशनचा विनंतीवजा इशारा, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

    4. सोलापुरात राष्ट्रवादीकडून सहा जिल्हा परिषद सदस्यांच्या निलंबनानंतर मोहिते पाटील गट आक्रमक, आधी अजित पवारांवर कारवाई करा, जयसिंह मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

    5. मराठीद्वेषी कर्नाटक नवनिर्माण सेना आणि झुंडशाहीविरोधात साहित्यिकांचा ठराव मंजूर, उस्मानाबादमधील साहित्य संमेलनाची सांगता






  1. मुंबईतील वाडिया हॉस्पिटल निधीअभावी बंद करण्याची प्रक्रिया सुरु, पालिका-राज्य सरकारनं 229 कोटींचं अनुदान थकवलं, कर्मचारी आज आंदोलन करणार

  2. ठाण्यात छोटा राजनचा उदो उदो, गडकरी रंगायतन समोरील बस स्टॉपवर कुख्यात गँगस्टरला वाढदिवासाच्या शुभेच्छा देणारे बॅनर

  3. डाव्या विचारसरणीच्या संघटना शिक्षणक्षेत्रातील वातावरण बिघडवताहेत, देशभरातले 200 शिक्षण तज्ज्ञ आणि प्रतिष्ठित विद्यापीठांच्या कुलगुरुंचं मोदींना पत्र

  4. अमेरिका-इराण संघर्ष सुरुच, इराणकडून अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांवर पुन्हा रॉकेट हल्ला, सहा दिवसांमधील दुसरा रॉकेट हल्ला

  5. आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या महिला संघाची घोषणा, हरमनप्रीत कौरच्या हाती कर्णधारपदाची धुरा तर मराठमोळी स्मृती मनधाना उपकर्णधार