1.राधाकृष्ण विखे विरोधी पक्ष नेतेपद सोडण्याच्या तयारीत, मुलगा सुजयच्या उमेदवारीसाठी अहमदनगरची जागा सुटत नसल्यानं हायकमांडविरोधात नाराजी
2. नातू पार्थसाठी शरद पवारांची लोकसभेतून माघार, मात्र माढातून लढण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते पवारांना गळ घालणार, पार्थसाठी अजितदादांच्या लॉबिंगची चर्चा
3.मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही भाजपचे पुण्याचे सहयोगी खासदार संजय काकडे काँग्रेस प्रवेशावर ठाम, भेटीनंतर 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया
4.राहुल गांधींकडून जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा आदरानं उल्लेख, भाजपकडून जोरदार टीका
5.मुंबई, नागपूर आणि मराठवाडा विद्यापीठाच्या वेळापत्रकात बदल, निवडणुकांच्या तारखांमुळे सीएची परीक्षा लांबणीवर
VIDEO | स्मार्ट बुलेटिन | 12 मार्च 2019 | मंगळवार | एबीपी माझा
6.कॉलेजच्या परीक्षा आणि दहावी-बारावीच्या निकालावर निवडणुकांचं सावट, मुंबई, नागपूर आणि मराठवाडा विद्यापीठाच्या वेळापत्रकात बदल
7.मराठा समाजाच्या मोर्चांमुळे नाही, आयोगाच्या सकारात्मक अहवालामुळे आरक्षण, मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचे राज्य सरकारकडून हायकोर्टात ठाम समर्थन
8.हेअर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेनंतर 50 तासांत मुंबईतल्या उद्योजकाचा मृत्यू, शस्त्रक्रियेदरम्यान हलगर्जीपणा दाखवल्यामुळं रुग्ण दगावल्याचा दावा
9.सरोगसीच्या माध्यमातून मृत मुलाला अपत्यप्राप्ती, कर्नाटकातील वृद्ध दाम्पत्याची हायकोर्टात धाव, संपत्तीला वारस मिळण्यासाठी दाम्पत्याचा खटाटोप
10.'स्वराज्यरक्षक संभाजी'नंतर डॉ. अमोल कोल्हे मालिकांतून विश्रांती घेणार, वैयक्तिक कारणांमुळे मनोरंजन विश्वातून सुट्टी घेण्याची डॉ. कोल्हेंची मालेगावात घोषणा