1. पालघरमधील बोईसरमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट, सात जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती, हादऱ्यानं निर्माणधीन इमारतही कोसळली
2. 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा आज अखेरचा दिवस, कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात ठराव येण्याची शक्यता
3. सारथीसंदर्भातला वादग्रस्त जीआर काढणाऱ्या सचिवांची हकालपट्टी करणार, राज्य सरकारच्या आश्वासनानंतर संभाजीराजेंचं उपोषण मागे,
4. काँग्रेसशासित राज्यात नागरिकत्त्व कायद्याविरोधात ठराव मंजूर करणार, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मोठा निर्णय, महाराष्ट्रात शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
5. प्रत्येक व्यक्तिला मत मांडण्याचा अधिकार, जेएनयूतील दीपिकाच्या भेटीवर अजय देवगणची माझाकडे प्रतिक्रिया, विरोधासाठी हिंसा अयोग्य असल्याचंही मत
6. देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतल्या IAS, IPS अधिकाऱ्यांमध्ये बदलीची धास्ती, शरद पवारांकडून खांदेपालटाचा सरकारला सल्ला
7. मुंबई विद्यापीठाचं विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ होणार, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतांची माहिती, मुंबई विद्यापीठाचा ताण कमी करण्यासाठी निर्णय
8. आजपासून गायी, म्हशीचं दूध 2 रुपयांनी महागलं, दूध पावडर आणि दूध खरेदी दरात वाढ झाल्यानं दरवाढीचा निर्णय
9. तेजस एक्स्प्रेसमधील पदार्थ खाल्ल्याने प्रवाशांना त्रास, शिळे अन्न असल्याचा प्रवाशांचा आरोप, करमाळी-मुंबई सीएसएमटी मार्गावर धावणाऱ्या गाडीतील प्रकार
10. एकादशीनिमित्त पंढरपुरात आलेल्या वारकऱ्याला 100 रुपयांच्या तिकीटावर लागली 50 लाखांची लॉटरी, भाग्यवान विजेत्याचा शोध सुरु